निस्वार्थ प्रेम करायला शिकवलंय.
निस्वार्थ प्रेम करायला शिकवलंय. माझ्या लहानपणी मी आई बरोबर माझ्या अंगणात लावले होते एक झाड | रोज त्याला पाणी घालत होतो मी सकाळ दुपार संध्याकाळ | झाड वाढत होते हळू हळू त्याला पाने येत होती मऊ मऊ | रोज त्याला पाहात होतो, लक्ष ठेवत होतो कोणी त्याला खाऊ नये म्हणुन जपत होतो | त्याला नवीन पालवी फुटली कि मी आनंदी व्हायचो त्याच एखाद पान गळून पडलं कि मी धाय मोकलून रडायचो| माझ्या जिवा पलीकडे प्रेम होते त्यावर माझ सर्वच होत ते त्याला काही झाले कि मला अजिबात सहन नाही व्हायचे| औषध द्यायचो मी त्याला ते बरं व्हावं म्हणुन ख़त घालायचो मी त्याला ते भर भर वाढाव म्हणुन | कधी कधी मी त्याला कुशीत घेऊन झोपायचो आईला हट्ट करून त्याच्यासाठी अंगाई गीत म्हणायचो | अंगाई गीत ऐकून चक्क माझ्या डोळ्या सारखं ते पण आपली पाने मिटून माझ्या मांडीवर झोपायचे | खरं सांगू तुम्हाला त्यानेच शिकवले मला निःस्वार्थ प्रेम करायला त्यानेच शिकवले मला दुसऱ्यासाठी आपले आयुष्य वाहुन द्यायला| खूप मोठं झाले आहे ते आज माझ कौतुक करतय माझी प्रगती पाहून आज मनापासून रडतय| माझ्या आईनी जन्म एका मुलाला दिला पण दोन मुलांना वाढवलं या जगानी सर्व...