प्रिय मित्र,

 दिवस रात्र मी माझ्या सर्व हितांमध्ये समृद्ध होत आहे.

दिवस रात्र मी माझ्या सर्व हितांमध्ये समृद्ध होत आहे.
प्रिय मित्र,
विषय : काळजी वाटते , काळजी घे, उपाय कर
पत्र लिहिण्यास कारण कि कालच तुझा बद्दल विषय निघाला तेव्हा समजले कि तुला कंबरेचा खूप त्रास होतो आहे. हा प्रश्न आता काही जुना नाही, आपले राहणी मान , रस्त्यावरचे खड्डे, काही प्रमाणात भेसळ युक्त अन्न आणि सततच्या विचारांचा ताण, बाकीचांच्या मनातले राग, लोभ, मत्सर आणि बरेच काही या परिस्थितीला कारणीभूत आहेत.
या वर काही चांगला उपाय करता येतील या साठी माझा मनात विचार आला कि तो तुला पत्रानेच कळवावा म्हणजे सविस्तर सांगता येईल शिवाय तुझ्याकडे याची प्रत राहील जी तू पुन्हा पुन्हा वाचू शकशील.
आता मूळ प्रश्नाकडे पाहूया , सतत चुकीचे बसणें, तासनतास एका ठिकाणी बसणें ,२ चाकी वरून सतत प्रवास, त्यात रस्त्यातील खाड्यांमुळे हाडांना लागणारे झटके, कमी झोप,नियमित व्यायाम, हाडांना मजबुती देणाऱ्या अन्नाचा अभाव या सगळ्या गोष्टींचा शरीवर आणि मनावर खोलवर परिणाम होतो आणि मग ते कुठल्या तरी दुखण्यातून ते आपले तोंड वर काढते. आपले शरीर काही प्रमाणात झीज सहन करते पण ते सहन शक्तीच्या पलीकडे गेले कि त्याची लक्षणे दिसायला लागतात. त्याकडे दुर्लक्ष करता काम नये. आपण आपले डॉक्टर व्हायला हवे. कारण आपलं शरीर सतत आपल्याला काहीतरी सांगत असते. कारण ते सुद्धा क्रिया आणि प्रतिक्रियांवर आधारितच आहे.
जर आपल्या एखादी गोष्ट खाल्लेली चालत नसेल आणि आपण तरीही ती खाल्ली तर आपले शरीर काहीतरी लक्षणे दाखवते. ते ओळखून , समजून आपण पुढच्या वेळेला ते टाळायला हवे किंवा चवी पुरते खावे.
आता कमरेच्या हाडांमध्ये एक चकती असते , ती ची पण झीज होते आणि ती सरकते सुद्धा , त्यामुळे कंबर किंवा पायाचे स्नायू दुखायला लागतात, चालताना त्रास होतो , पळू शकत नाही , खूप वेळ बसू शकत नाही, मांडी घालायला त्रास होतो आणि असे बरेच सामान्य वावरातल्या गोष्टी करताना पण त्रास होतो. मनात शंभर विचार येतात "मीच का ? आता काय करू? कसा यातून बाहेर पडू ? ऑपेरेशन करावे लागेल? मी पूर्ण बरा होईन का?" असे हजारो प्रश्न भेडसावतात.
याला आपण घाबरायचे का ? त्या विरुद्ध मनाचा, जगात असलेल्या माहितीचा वापर करायचा का ? हो आपण हे करू शकतो, एकदा का आपण हे केले कि त्यांनी एक दुखणे मागे पडते आणि जीवनाचा आनंद मिळतो तो हि अमर्यादित.
बाहेरची माहितीचा (कसे वागावे , काय करू नये आणि काय खावे )वापर हा ३०% काम करतो, बाकी ७०% हे पूर्णपणे तुमच्या मनावर,विश्वासावर आणि श्रध्येवर अवलंबून आहे.
आपण सुरवातीला महत्वाच्या खाण्या कडे पाहू, ४ मनुके,२ खारीक, २ खजूर रोज गायी सारखे रवंथ करत खाणे, पटापट खाऊन संपवणे नाही हे लक्षात ठेवायलाच हवे. त्याचे कारण म्हणजे तुमच्या मनाचे समाधान व्हायला हवे अपेक्षित आहे, जर मनाला आनंद मिळाला कि ते बरोबर हवे तिथे पोहोचेल.
डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा, त्यामुळे आपल्याला अंदाज येतो कि काय झाले आहे,त्यांच्या म्हणण्या प्रमाणे traction किंवा पूरक व्यायाम जरून करावे. तुमच्या स्नायूंना मजबुती येणे खूप महत्वाचे आहे. तुमचे स्नायू म्हणजे गाडीचे shock-obsorber आहेत, ते आघात सहन करतात आणि पुढे हाडांवर कमी ताण पडतो.(म्हणून पट्ट्याचा वापर करा हे सांगतात)
दुखणे बरे करण्यासाठी आपण acupunture आणि acupressure चा वापर खूप करू शकतो, त्यामुळे सुधारणा होण्यात मदत होते.
आता आपण हालचालींनावर बघूया:- जिथे जिथे तुम्हाला वाटते कि आपल्याला हे किंवा ते करताना थोडासा तरी त्रास होतो आहे ते सुरवातीला टाळणे.त्या ऐवजी चालू शकणारे दुसरे पर्याय निवडावे.
उदा. पुढे वाकणे, २ व्हिलर ऐवजी ४ व्हिलर चा वापर, कमरेच्या पट्ट्याचा वापर जास्त बसताना किंवा प्रवास करताना करावा.
ताठ बसणें, पोक काढून बसले तर अजून हाडांवर ताण येतो. खाली बसताना पाठीला आणि कमरेला चांगला support मिळाला पाहिजे.
चालताना चप्पल हि खास मऊ असावी ज्यामुळे पायाच्या हाडांवर ताण नाही येणार, घरात सुद्धा मऊ चप्पल वापरावी.
खुर्चीवर, सोफ्यावर बसताना पूर्ण मागे टेकून बसावे, खूप खोल जाणारा सोफा किंवा खूप मऊ सोफा बसण्यासाठी टाळावा.
दर ३० ते ४० मिनिटांनी एकदा शरीराची हालचाल करावी.
वरील गोष्टी आपण स्वतःसाठीच करत आहोत, म्हणूनच त्या जर तंतोतंत पाळल्यात तर त्याची सुधारणा होण्यात खुप मदत होते.
आता मनाची शक्ती वाढण्यासाठी : आपले मन जसे वाळवाल तसे वळते. म्हणून त्याचा वापर स्वतःच्या सुधारणेत करा. रोज मानसिक व्यायाम आणि मनाला नवीन चांगल्या विचारात गुंगवणे खूप गरजेचे आहे.
ज्या भागात सुधारणेची गरज आहे - तिथे मन एकाग्रीत करून सुधारणेसाठी ऊर्जा पुरवणे, त्यामुळे ती जागा भरून निघते. देवावर किंवा कोणावरतरी खूप श्रद्धा आणि विश्वास असणे खूप गरजेचे आहे, कारण त्यात चमत्कार घडवून आणण्याची शक्ती आहे.
हे अजून नीट समजून घायचे असेल तर - joseph murphy चे "The power of subconscious Mind" जरूर वाचा आणि जास्त वेळा वाचा.
आता तुम्हाला पळणे हे सर्वात कठीण वाटत असणार, आणि मी या पुढे पळू शकीन कि नाही याची खात्री वाटत नसेल तर "रोज दिवसातून २-३ किंवा जास्त वेळा running चे video बघा", यामुळे तुमच्या मनात एक काहीतरी करण्याची आणि पळण्याची जिज्ञासा निर्माण होईल. तीच आपल्याला हवी आहे पूर्ण बरे होई पर्यंत, कारण आपल्याला खरे बरे तीच करणार आहे. ती आग म्हणून सतत पेटत राहायला हवी. तो एक ध्यास व्हायला हवा.
बदल हळू हळू घडतील किंवा अचानक घडतील, त्याकडे तुम्ही लक्ष द्यायची गरज नाही.
रोज सकाळी किंवा संध्याकाळी १५ मिनिटे एका खुर्चीवर किंवा तुम्हाला जिथे ठीक वाटेल , दुखणार नाही अशा स्थितीत बसून हे मानस चलचित्र बघा.
मी १० किलोमीटर पळतो तुमच्या घरापासून ते एक ठरावी ठिकाण पर्यंत ते रोज बघा, ते बघताना त्या चल-चित्रात हि सर्व कृतींचा बारीकीने अभ्यास करा.
उदा . मी गादीवरून उठलो- कपडे घातले - दर उघडले - चपला किंवा बूट काढले - घातले -लेस बांधली - जिने उतरलो - सोसाटीच्या गेट पाशी आलो - पुढे चालायला लागलो - रास्ता क्रॉस केला........चालून पूर्ण झाल्यावर तुम्हाला खूप बरे वाटत आहे ... तुमचे मित्र तुमच्या प्रगतीबद्दल तुम्हाला अभिनंदन देत आहेत.
हे चलचित्र रोज पाहणे गरजेचे आहे, यामुळे होणार काय ते पाहूया , तुम्ही तुमच्या मनाला सांगत आहात कि माझे शरीर मला कसे हवे आहे, कारण ते त्यांनीच तयार केले आहे त्यामुळे त्याला माहित आहे कि ते परत हवे तसे कसे ठेवायचे. पण होणारे परिणाम आणि येणार अनुभव हा तुमच्या इच्छेवर , श्रध्येवर आणि विश्वासावर हे अवलंबून आहे.
जर तुम्ही घाबरून प्रयत नाही केलेत तर बदल होतील किंवा होणार नाहीत , अचानक होणार चमत्कार हवा असेल तर तुमची श्रद्धा आणि विश्वास हा त्या पातळीचा हवा, जरा जरी शंका मनात असेल कि असा चमत्कार होऊ शकत नाही , तर तुम्ही सरळ प्रयत्ननाकडे वळा आणि रोज थोडी थोडी प्रगती करा. एक दिवस तो विश्वास आणि ती श्रद्धा तुम्हाला पहिल्या सारखे किंवा त्याहून सुदृढ करेल आणि तुम्ही एक नवीन आणि सुंदर आयुष्य जगाल.
मला जो अनुभव आला त्यावरून मी हे लिहिले आहे, यामुळे तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल.
अजून काही माहिती हवी असेल तर जरूर विचार, मी माझ्याकडून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करीन.
धन्यवाद.
योगेश दाडकर

Comments

Popular posts from this blog

अभिमन्यू चक्रव्यूह :

!! मला जागा द्या !!

आपल्या मनाचा वापर कसा करायचा: