!! मला जागा द्या !!
!! मला जागा द्या !!
खूप दिवसांपासून या विषयावर लिहायची इच्छा होती, शेवटी आज हा विषय मांडावा असं वाटलं .
आपण खूप घाईत, सकाळी स्वतःचे प्रातः विधी करून, तयार होऊन ऑफिसला जायला निघतो. आता कोण २ व्हिलर,कोण ४ व्हिलर काढतो (स्त्री पुरुष सगळे). रस्त्यानी निघाला कि हातात गाडी आणि डोक्यात विचार असे आपण प्रवासाला निघतो. कोणाचा १ किलोमीटरचा प्रवास तर कोणाचा ५० किलोमीटरचा. आता या पूर्ण प्रवासात निघाल्या पासून ते इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत तुम्हाला हजारो गाड्या दिसतात किंवा लागतात (सायकली,बसेस,दुसर्यांचा ४ व्हिलर,२ व्हेलीर आणि रिक्षा इत्यादी ).दुसऱ्या भाषेत म्हणाल तर त्या तुमच्या मध्ये येतात.
आता आपण मूळ मुद्याकडे वळूया, ती म्हणजे गाडी चालवता पुढे जाण्याची घाई. आता जायचा तर सगळ्यांनाच असतं. पण मी पुढे मी पुढे यात सगळे लागलेले असतात. आता तुम्ही म्हणाला यात काय गौण आहे ? नाहीच आहे. मला तुमच्या पुढे पुढे करण्याबद्दल तक्रार करायचीच नाही आहे. मला तुमच लक्ष सवयीकडे केन्दत्रित करायचा आहे.
आता सवय म्हणजे एखादी गोष्ट एका विशिष्ट पद्धतीने परत परत करणे याला सवय असे म्हणतात.आपण जेव्हा कुठलीही गाडी पहिल्यांदा हातात घेतो तेव्हा दबकत चालवतो, पण जसे त्यात सराईत होतो तसे मस्त ऐटीत चालवायला लागतो. सुरवातीला २ व्हिलर एकट्याने नंतर डबल सीट नंतर तर ट्रिपल सीट सुद्धा घेतो. हे सगळं शक्य होतं ते २ महत्वाच्या गोष्टींमुळे. त्या खालील प्रमाणे :
१) शिकण्याची इच्छा
२) मेंदूंमधील +ve सर्वो मॅकॅनिसम
म्हणजे जी घाई (स्वतःला आणि दुसऱ्याला जपून)आपण गाडी चालवताना करतो , तीच आणि तशीच घाई आपल्याला आपल्या प्रगतीत करायची आहे. आता तुम्ही म्हणाला या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तर ते तसं नाही. तुम्ही गाडी चालवताना हॅन्डल किंवा स्टेरिंग, ब्रेक,क्लच,एक्सलेटर,फ्रंट मिरर,बॅक मिरर या आणि अजून बऱ्याच गोष्टींचा वापर करून गाडी चालवता, त्यात मनात वेगळे विचार चालू असतात किंवा गाणी ऐकत असतात.
हे सगळं करत करत तुम्ही तुमच्या अपेक्षित जागेवर पोहोचता.म्हणजे तुम्ही तुमच्या मेंदूमधील +ve सर्वो मॅकॅनिसमला वापर करून त्याला मिळणाऱ्या -ve feedback वापर करून +ve प्रोग्रेस किंवा प्रगती करता आणि आत्ता सुद्धा करत आहात.
आता आपल्याला हितच गोष्ट आपल्या प्रत्येक बाबतीत करायची आहे, ती कशी ते आता पुढे समजून घेऊया.
१) गाडी चालवताना लागणाऱ्या parts प्रमाणे आपण प्रत्येक काम करताना कुठले कुठले parts लागतात याची नोंद वही बनवायची किंवा प्रत्येक कामातली तरबेज व्यक्ती कसं करते याचा अभयास किंवा याचा निरीक्षण करायचे.
२) मी जर सतत +ve सर्वो मॅकॅनिसमचा वापर आणि त्यातून मिळणारा feedback हा सुधारणेत (improvement )वापरला तर तेच तेच काम प्रयेक वेळेला जास्तीत जास्त चांगला होत जाईल आणि मग तुम्हालाच जाणवेल कि मी या ठराविक कामात गाडी फास्ट चालवतो आहे.
तुम्ही याचा वापर तुमच्या घरातल्या कामामध्ये किंवा ऑफिसमधल्या कामामध्ये किंवा नात्यामध्ये किंवा स्वतःच्या प्रगतीत सुद्धा करू शकता. आणि हो फरक दिसतो. जसं २ दिवस gym केलं कि अंग दुखायला लागतं तसाच आहे हे.
पण होणार फरक सतत हवा असेल तर कोण तरी विचारणारं हवं. म्हणजेच प्रत्येक कामातील प्रगती (verification) पडताळणारा हवा. जो तुम्हाला तुम्ही गाडी बरोबर पळवतायना हे सांगेलं. You should be accountable for your right progress.
जर हे तुम्ही करू शकत असाल आणि करत आहात तर मी म्हणेन कि तुम्हाला गाडी पळवायचा अधिकार आहे...........
लेखक
योगेश दाडकर
Comments
Post a Comment