अभिमन्यू चक्रव्यूह :
मला कोणाच्याही मनाला दुखावण्याचा प्रयत्न इथे केलेला नाही, जे प्रत्यक्षात दिसते आहे , तेच सांगतो आहे. कदाचित ते चुकीचे पण असेल. त्यासाठी क्षमस्व
अभिमन्यू चक्रव्यूह :
कितीही प्रयत्न केलेस तरी
पुन्हा तू अडकणार
पुन्हा तू या डबक्यात येऊन पडणार
नवीन दिवस नवीन विचार नवीन इच्छा आणि मार्ग घेऊन येणार
खूप चिकाटी, प्रयत्नांची पराकाष्टा, धर्य धावून सुद्दा
तू परत त्या डबक्यातच राहणार
व्यर्थ जातात तुझे प्रयत्न, नाही किंमत तुझा इच्छांना
धुळी सारख्या हवेत उडून नाहीशा होतात तुझा कल्पना
या ब्रह्मांडा मधला एवंडुसा कण तू
याच मातीतून आला तू सुद्धा एक दिवस याच मातीत मिसळून जाणार
शांत कर मनाला, नको पळूस त्याच्या मागे
घे लगाम त्याची हातात तुझ्या
सोडून दे हा लपाछपीचा खेळ
जग जीवन सामान्य
दुसऱ्याला पण ते जगण्यात मदत कर
सोडून दे alexander सारखे "concurring the world " चे स्वप्न
एक सामान्य माणूस बनायचा प्रयत्न कर
सोडून दे राग,लोभ,द्वेष,मद आणि मत्सर
स्वतःमधल्या माणसाला जागवण्याचा आणि जगवण्याचा प्रयत्न कर
Comments
Post a Comment