!!!आवड आणि जीवन!!!!

 

हा विषय खूप जुना आहे.तसे यावर खूप लोकांनी लिहिले पण आहे. आज मी माझ्या अनुभवांवरून या बद्दल माझे मत मांडणार आहे. कदाचित ते तुम्हाला आवडेल.
प्रत्येक माणसाची आवड वेगळी असते आणि त्यानी ती लहान असतानाच ओळखली तर खूप उत्तम, जर ती तुमची तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही तुमच्या घरच्या माणसांची म्हणजेच आई,वडील,मित्र, मैत्रीण किंवा तुमच्या साथीदाराची मदत घेऊ शकता. याला एक कारण आहे , जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करत असता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा भाव, आनंद , तुमची एकाग्रता, आणि तुमची चिकाटी तुम्ही नाही बघू शकत , पण ते तुमच्या आसपासच्या माणसांना लगेच समजते.आणि याचा तुम्हाला स्वतःला समजून घेण्यासाठी त्याचा खूप फायदा होऊ शकतो.
आता लोक म्हणतात कि कधी कधी जसा माणूस मोठा होतो तश्या त्याच्या आवडी निवडी बदलतात. असेलही काही टक्के ते खरे पण मूळ आवड जी तुम्ही तुमच्या जन्माबरोबर या जगात घेऊन आला आहात ती तशीच असते. त्याला जी बालपणात समजते आणि उमजते तो सर्वात भाग्यवान.
बऱ्याच लोकांनबरोबर अगदी विरुद्ध घडते, परिस्थितीमुळे त्यांना त्यांच्या आवडी सोडाव्या लागतात किंवा काही लोकांना कळतंच नाही कि नक्की त्यांना करायला काय आवडतं.
बरीच लोक त्यांना जे आवडत ते सोडून पैसे कमावण्याच्या मागे जातात आणि मग त्यातच त्यांचं आयुष्य गुरफटून जातं.अशा लोकांना जेव्हा सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यावर काहीच काम नसते किंवा पैसे कमावण्याच्या म्हणजेच दुसऱ्या भाषेत रिटायरमेंट नंतर या गोष्टी आठवायला लागतात कि अरे मला आयुष्यात हे करायचे होते पण मी ते केलेच नाही... आधी जबाबदाऱ्या पूर्ण करू आणि मग करू म्हणत म्हणत एवढी वर्ष निघून गेली आणि आता इच्छा आहे पण शरीर साथ देत नाही किंवा आता ती वेळ निघून गेली असे वाटते.अशी खुप लोक आहेत. म्हणूनच म्हणतो अजूनही वेळ गेलेली नाही, तुमची आवडी गोष्ट अजूनही करायची राहायला असेल आणि ती आता करणे शक्य असेल तर ती लगेच करा. बघा! तुम्हाला नक्कीच तरुण झाल्या सारखे वाटेल. हे घडतंच, कारण त्यात तेवढी ताकद आहेच.
माझे तर फारच विचित्र आहे , कदाचित मी काही लोकांमधला आहे ज्यांना बऱ्याच गोष्टी कराव्याशा वाटतात आणि त्या हि मनापासून, त्यामुळे नक्की काय आवडते हे समजतच नाही. असे पण असू शकते कि त्यामध्ये अहंभाव सुखावतो म्हणून सगळे करावेसे वाटते, हे हि असेल कदाचित. अहंभावर तुम्ही माझ्या पुढच्या लेखात वाचा!!!
आता आपण आवडीकडे बघू, काहींना गाणी ऐकायची आवड असते किंवा काहींना चित्र काढायची किंवा काहींना गप्पा मारण्याची किंवा काहींना दुसऱ्याची चेष्टा करण्याची किंवा काहींना दुसऱ्याला खायला करून घालण्याची आवड असते किंवा काहींना फिरण्याची. हे जे काही आहे ते त्या माणसाच्या सुप्त मनातून येत असते.
आता आपण आवडीचा आणि मनाचा संबंध बघूया.. जर तुम्हाला एखादी आवड असेल आणि ती तुम्ही नित्यनियमांनी करत असाल तर नकळत पणे तुम्ही तुमचं स्वतःच आणि त्या बरोबर तुमच्या बरोबरच्या माणसांचे आयुष्य वाढवत असता. जरा दोन मिनिटे वाचायचे थांबा आणि विचार करा!!! कि जेव्हा तुम्ही आवडीच्या गोष्टी करत असता तेव्हा तुम्ही नेहमीपेक्षा जास्त आनंदी असता ना?, स्वतः स्वतःमध्ये पूर्णपणे गुंतलेलं असतात आणि एक सुंदर ताल तुम्ही गुणगुणत असता किंवा तो सुंदर क्षण तुमचा असतो ज्यामध्ये तुम्ही काहीतरी घडवत असता आणि त्याबरोबर त्याच वेळेला तुमच्या शरीरात सगळं काही सुरळीत चालू असते. स्वाशोस्वास सुरळीत आणि मंद होत असतो, हृदय नीट रक्त शुद्धीकरण करत असतं, मनावर कुठलाही ताण नसतो ,त्यामुळे शरीरात रक्त वेवस्थित पोहोचत असतं. यालाच आपण भान हरपणे असे म्हणतो.
आणि कदाचित याचमुळे ..जी माणसे जे मनापासून आवडते आणि ते ती करतात ती दीर्घायुषी होतात आणि ठणठणीत राहतात.
म्हणूनच, मी म्हणतो कि जर तुमचं शरीर सुधृद राहणार असेल तर तुम्ही ते जरूर करावं. खरंच, पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाला असे जगता यावे हीच इच्छा........म्हणजे रोगराईला जागाच उरणार नाही.
लेखक
योगेश दाडकर

Comments

Popular posts from this blog

अभिमन्यू चक्रव्यूह :

!! मला जागा द्या !!

आपल्या मनाचा वापर कसा करायचा: