इच्छा, चिकाटी, शिस्त, इच्छाशक्ती, विश्वास, जिद्दी, दृढनिश्चय?


आजचा विषय सगळ्यांचा मनातला आहे. तो म्हणजे यश. आज इकडे तिकडे बघा, सगळे यशाचा मागे पळताना दिसतात. यावर तुम्ही म्हणाल यात काय गौण आहे. गौण काहीच नाही. उलट मी म्हणेन कि हा २ अक्षांरांचा खेळ जिंकायला भरपूर काही लागतं. ते कोणाच्या वाट्याला येत किंवा कोणाचा वाट्याला येतच नाही, कितीही प्रयत्न केले तरी, मग तो किंवा ती किंवा त्याचा जवळचे शेवटी ते नशिबावर किंवा कर्मावर सोडून देतात.
पण याचा विरुद्ध जे यश मिळेपर्यंत जे लढतात त्याला तोड नाही. हिंदी मध्ये म्हणायचं तर "उनका तो जवाब नाही,उनकेलीये ये लब्ज भी कम है!".
आपण अशा बऱ्याच लोकांची उदाहरणे पाहिलीत किंवा ऐकलीत सुद्धा. त्या आधी हे का घडतं याची कारणं पाहुयात.
यश मिळवण्यासाठी ज्या ११ गोष्टींची गरज लागते, त्याचं सगळ्या गोष्टी या माझा आजच्या लेखाच्या शीर्षक आहेत. कारण जीवनात याचं गोष्टींची जाणीव जो पर्यंत पूर्ण पणे होत नाही, तोपर्यंत यश तुमच्यापासून मैलावरच राहतं.यालाच मराठीत एक म्हण आहे "कळतंय पण वळत नाही" किंवा "ज्ञान आहे पण ते कसं वापरायचं तेच कळत नाही". म्हणूनच आयुष्यात एक चांगला गुरु मिळायला खूप भाग्य लागतं. असो.
आता आपण मूळ मुद्द्य कडे वळूया, त्या सात गोष्टी ज्या तुम्हाला अपयशाच्या हद्दीतून यशाचा हद्दीत जाण्यासाठी लक्षुमन रेषा पार करायला मदत करतात.
त्या आहेत : जिद्द,चिकाटी,शिस्त,इच्छाशक्ती,विश्वास,ज्ञान,धैर्य,धृढ संकल्प,श्रद्धा,विकास,विचार आणि सतकुर्त्याची भावना. याचा विरुद्ध उभ्या असलेल्या सात गोष्टी ज्यामुळे तुमचं यश तुमच्यापासून लांब राहतं
त्या आहेत : भीती,स्वतःशी खोट बोलणे,चुकीचे मार्ग अवलंबणे,लालसा,अहंकार,नवीन न शिकण्याची वृत्ती आणि स्वतःत सुधारणा करण्याची जबाबदारी.
आधी आपण यश मिळवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींकडे बघूया. जिद्द हि तुमचा इच्छेवर खूप अवलंबून असते. तुमची इच्छा जर प्रबळ असेल. तर तिला जिद्दी ची साथ दिल्याने खूप फायदा होतो. त्याच बरोबर बाकीचा गोष्टींची साथ हि तुम्हाला लागतेच.
वरील दिलेल्या गोष्टी आपण काही गोष्टींमधून समजून घेणं आहोत.
माझी पहिली जी गोष्ट आहे ती मला "विचार करा आणि श्रीमंत व्हा" या नेपोलियन हिलच्या पुस्तकात वाचायला मिळाली.
१) एक गाव असतं. त्यात एक खाण काम करणारा व्यापारी होता. जास्त मोठा व्यावसाय नव्हता त्याचा, पण काही पुरुष बायका काम करायचे त्याचाकडे आणि तो रोज त्यांना दिवसाचा पगार द्यायचा.
एक दिवस दुपारी एक ८ वर्षाची मुलगी तो कामात गुंगलेला असताना आली आणि म्हणाली "आई ने कामाचे पैसे आणायला पाठवला आहे."त्यावर तो मालक म्हणाला "हा मी पाठवून देईन, जा तू". हे ऐकल्यावर ती मुलगी जागेवरची अजिबात हल्ली नाही. तिथेच उभी राहिली. आणि मालक पण आपल्या कामात गुंग झाला. थोड्यावेळानी त्याचं लक्ष त्याचा कामातून बाहेर आला, तर त्याला जाणवलं कि ती मुलगी अजून तिथेच उभी आहे. हे बघून तूच मनात संताप आला.त्याचा मनात विचार आलं "हि एव्हढुशी लहान मुलगी अजून गेली कशी नाही, थांब हिला घाबरवतो." तो त्या मुलीवर तिथे जवळच पडलेला लाकडाचा ओंडका हातात घेऊन तिच्यावर धावून घेला, हे घडताना त्याच क्षणी ती मुलगी ना घाबरता पुढे सरसावून त्या मालकाचा डोळ्यात डोळे घालून म्हणाली "आईने कामाचे पैसे आणायला पाठवलं आहे." तिचा तो आवाक बघून, तो ६०चा जवळचा मालक धपकन खाली बसला, खिशात हात घालून पैसे काढले आणि त्या मुलीचा हातात ठेवले. पैसे मिळताच ती मुलगी तो दिसेनासा होईपर्यंत त्याचा डोळ्यात डोळे घालत निघून गेली. ती गेल्यावर त्याचा मनात एक वादळ येऊन गेलं. काय केला त्या एवढाश्या लहान मुलींनी? विनाशास्त्र तिच्यात एवढं धाडस आलं कोठून? ती काहीच का घाबरली नाही? असे बरेच प्रश्न त्याला पडले, तसे ते लेखकालाही पडले.
काय होतं त्या मुलीत ज्याचा तिनी पूर्णपणे वापर केला? विश्वास कि जिद्द कि चिकाटी का इच्छाशक्ती ?

Comments

Popular posts from this blog

अभिमन्यू चक्रव्यूह :

!! मला जागा द्या !!

आपल्या मनाचा वापर कसा करायचा: