आत्ता
आत्ता मला वाटलं कि मी आत्ता किंवा इंग्लिशमध्ये म्हणायचं तर now वर काहीतरी लिहावं आणि मी ते लिहायला घेतलं.
आजचा विषय आहे आत्ता, हो आत्ताच. यात खूप मोठी गम्मत आहे.
कोणी तुम्हाला काही बोललं म्हणून त्यावर विचार करण्यासाठी हा क्षण द्यायचा की ते सोडून दुसऱ्या कुठल्या गोष्टीत तो व्यतीत करायचा. आता तुम्ही म्हणाल कि सगळे सल्ले वाईट नसतात किंवा विचार करायला लावणारे असतात. हो नक्कीच आणि विचार केलाच पाहिजे.
तुम्ही कसा विचार करतात यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.असो
कुठल्या कंपनीचा मालक असो किंवा एखादा नोकर दोघांना घड्याळाचे २४ तासच मिळतात. पण मिळणार वेळ तो कसा वापरतो यामुळे फरक पडतो. म्हणजे whatsapp वर पूर्ण दिवस किंवा youtube वर विडिओ बघण्यात दिवस गेला तर फरक काहीच पडणार नाही. कारण तुम्ही तुमचा प्रगतीसाठी काहीच केलं नाही. त्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस सारखाच असेल.
मग यात बदल कसा करायचा ?
सुरवात आत्ता हे वाचून झाल्यावर लगेच करा, कुठलीही एखादी गोष्ट ठरवा. उदा. gym जाणे , पायी फिरणे,कमी बोलणे, आपण काय बोलतो यावर लक्ष ठेवणे, हळू चालणे, सावकाश जेवणे, जेवताना phone न बघणे/ tv न बघणे, ताठ बसणे, रोज भरपूर पाणी पिणे,नवीन मित्र बनवणे किंवा स्वतःचा कामातील चुका शोधणे वगरे वगरे.
हो पण काहीतरी लगेच सुरु केलच पाहिजे, नाही तर काम न करण्याची किंवा पुढे ढकलण्याची पण सवय लागते. आणि एकदा ती लागली कि मग आत्ता काहीच काम होत नाही, सगळी कामं नतंर...असं होतं.
तुम्ही यासाठी mobile मध्ये alarm लावू शकता कि तो तुम्हाला आठवण करून देईल.
या क्षणाचा खेळ काही औरच आहे, तुम्ही जस जशा नवं नवीन सवयी लावायला सुरवात करता तस तशी तुम्हाला याची पण सवय होते. आणि मग घरातले शेजारचे ऑफिस मधले म्हणायला लागतात "हि किंवा तो खूप बदलला, पूर्वी त्याचं किंवा तिचं काहीच काम झालेलं नसायचं , आता before time ". हीच ती पोच पावती जी तुम्हाला पण मिळेल जर हि सवय लावलीत तर.
आता फरक म्हणाल तर पडतो, त्यासाठी प्रयत्न करायलाच पाहिजे. आणि केलेले प्रयत्न वाया जात नाहीत, ते कर्म जर चांगलं असेल ते तुमच्याकडे १० हातांनी चांगल्या मार्गाने परत येतंच. आणि हा तर क्रिया प्रतिक्रियेचा नियम आहे.
लेख संपवताना एकच सांगतो, जेव्हांच काम तेव्हा केल्यावर किंवा मनात आलेला काम लगेच केल्यावर जे समाधान मिळतं ते शब्दात नाही मांडता येत.
लेखक
योगेश दाडकर
Comments
Post a Comment